अे.अे. तुमच्यासाठी आहे का?

तुम्हाला अे.अे. मध्ये येऊन प्रयत्न करावयाचा आहे का? किंवा अे.अे. तुम्हाला मदत करू शकेल असे तुम्हाला तुम्हाला वाटते का? हे फक्त तुम्हीच ठरवू शकता.

अे.अे. मधील आम्ही, अे.अे. मध्ये आलो कारण सरतेशेवटी आम्ही नियंत्रित मधपान करण्याचा प्रयत्न सोडून दिला. आम्ही कधीही नियंत्रित मधपान करू शकणार नाही हे मान्य करण्याचा आम्हाला अजूनही तिटकारा वाटतो. नंतर आम्ही इतर अे.अे. सभासदांकडून ऐकले की आम्ही आजारी आहोत (अनेक वर्षे आम्हास तसे वाटत होते !). आम्हास समजले की अनेकजण आमच्यासारखेच अपराधीपणा, एकटेपणा, असाहाय्यता या भावनांनी त्रासलेलो होतो. आम्हास समजले की आम्हास मधपाश हा आजार झाला असल्या कारणाने आमच्या मनांत ह्या भावना होत्या.

आम्ही निर्णय केला की, मधपानाने आमची जी अवास्त केली आहे त्याला आम्ही तोंड देण्याचा प्रयत्न करू. आम्ही पुढे दिलेल्या काही प्रश्नांचे “प्रामाणिकपणे” उतर देण्याचा प्रयत्न केला.

१. तुम्ही कधी एखादा आठवडा किंवा असाच काही काळ मधपान थांबविण्याचा निर्णय केला पण काही दिवसच तो पाळू शकलात? (होय / नाही).

२. इतरांनी तुमच्या मधपानाच्या बाबतीत बोलू नये – तुम्ही काय करावे हे तुम्हाला सांगू नये, असे तुम्हास वाटत होते का? (होय / नाही).

३. तुम्ही कधी, आपण बेहोष होणार नाही, ह्या आशेने मधाचे प्रकार बदलून पहाण्याचा प्रयत्न केला आहे का? (होय / नाही).

४. मागील काही वर्षे तुम्हाला जाग आल्यावर डोळे उघडण्यासाठी मधाची आवश्यकता भासली आहे का? (होय / नाही).

५. जे लोक कोणत्याही अडचणीत न सापडता मधपान करू शकतात, त्यांचा तुम्हाला हेवा वाटतो का? (होय / नाही).

६. मागील काही वर्षात मधपानाशी निगडीत अशा समस्या तुम्हाला निर्माण झाल्या होत्या का? (होय / नाही).

७. तुमच्या मधपानामुळे तुमच्या कुटुंबात काही समस्या निर्माण झाल्या आहेत का? (होय / नाही).

८. तुम्ही समारंभात तुम्हाला पुरेसे मध मिळाले नाही म्हणून अधिक मध मिळविण्याचा प्रयत्न केले आहे का? (होय / नाही).

९. जरी तुम्ही तुमची इच्छा नसतांना बेहोष होत होतात तरी, आम्ही पाहिजे तेव्हा मधपान थांबवू शकोतो असे स्वतःलाच सांगत होतात का? (होय / नाही).

१०. मधपानामुळे कधी तुमच्या शाळेत किवा कामाच्या ठिकाणी रजा झाल्या आहेत का? (होय / नाही).

११. तुम्ही कधी बेशुद्धावस्थेत गेला आहात का? (होय / नाही).

१२. मधपान न केल्यास आपले जीवन चांगले होईल असे तुम्हास कधी वाटले होते का? (होय / नाही).

तुम्ही कोठे आहात?

तुम्ही चार किंवा अधिक प्रश्नांना होय उतर दिले आहे का? तसे असेल तर कदाचित मधपान ही तुमची समस्या असू शकेल. आम्ही असे का म्हणतो? कारण हजारो अे.अे. सभासद अनेक वर्षे हेच सांगत आहेत. त्यांना स्वतःची खरी ओळख अतिशय क्लेशकारक मार्गांनी काळली.

परंतु अे.अे. तुमच्यासाठी आहे का हे फक्त तुम्हीच ठरवू शकता. ह्या विषयावर खुले मन ठेवण्याचा प्रयत्न करा. जर उतर होकारार्थी असेल, तर आम्ही मधपान कसे थांबविले हे दाखविण्यात आम्हला आनंद वाटेल.

अे.अे. सर्व साधारण सेवा परिषदेने संमत् केलेले साहित्य

अधिक माहितीसाठी संपर्क साधा