अे.अे. तुमच्यासाठी आहे का ?

तुम्हाला अे.अे. मध्ये येऊन प्रयत्न करावयाचा आहे का? किंवा अे.अे. तुम्हाला मदत करू शकेल असे तुम्हाला वाटते का? हे फक्त तुम्हीच ठरूवू शकता.

अे.अे. मधील आम्ही, अे.अे. मध्ये आलो कारण सरतेशेवटी आम्ही नियंत्रीत मद्यपान करण्याचा प्रयत्न सोडून दिला. आम्ही कधीही नियंत्रीत मद्यपान करू शकणार नाही हे मान्य करण्याचा आम्हाला अजूनही तिटकारा वाटतो. नंतर आम्ही इतर अे.अे. सभासदांकडून ऐकले की आम्ही आजारी आहोत. ( अनेक वर्षे आम्हास तसे वाटत होते! ) आम्हाला समजले की अनेकजण आमच्यासारखेच अपराधिपणा, एकटेपणा, असहाय्यता या भावनांनी त्रासलेले होते. आम्हास समजले की आम्हास मद्यपाश हा आजार झाला असल्या कारणाने आमच्या मनांत ह्या भावना होत्या.

आम्ही निर्णय केला की, मद्यपानाने आमची जी अवस्था केली आहे त्याला आम्ही तोंड देण्याचा प्रयत्न करू. आम्ही पुढे दिलेल्या काही प्रश्नांचे *’प्रामाणिकपणे”* उत्तर देण्याचा प्रयत्न केला. जर चार किंवा अधिक प्रश्नांचे उत्तर होय असेल तर आमची मद्यपानाची समस्या गंभीर स्वरूपाची असेल.तुम्ही प्रयत्न करून पहा. लक्षात ठेवा की मला मद्यपानाची समस्या आहे ह्या सत्याला सामोरे जाण्यात काहिच लाजिरवाने नाही.

अे.अे. सर्व साधारण सेवा परिषदेने संमत् केलेले साहित्य

अधिक माहितीसाठी संपर्क साधा

————————————-

तुम्ही कधी एखादा आठवडा किंवा असाच काही काळ मधपान थांबविण्याचा निर्णय केला पण काही दिवसच तो पाळू शकलात?

अे.अे. मधील आमच्यापैकी अनेकांनी स्वतःला व कुटुंबियांना अनेक प्रकारची वचने दिली होती. आम्ही त्या वचनांचे पालन करू शकलो नाही. नंतर आम्ही अे.अे. त आलो. अे.अे. ने आम्हाला सांगितले “फक्त आजचा दिवस मद्यपान न करण्याचा प्रयत्न कर.” ( जर तुम्ही आज मद्यपान केले नाहीत तर तुम्ही आज बेहोष होऊ शकत नाही. )

 

 
 

इतरांनी तुम्हाच्या मद्यपानाच्या बाबतीत बोलू नये – तुम्ही काय करावे हे तुम्हांला सांगू नये, असे तुम्हाला वाटत होते का?

अे. अे. मध्ये आम्ही कोणासही काहीही करण्यास सांगत नाही. आम्ही फक्त आमच्या मद्यपानासंबंधी, आम्ही कोणत्या संकटात सापडलो आणि आम्ही मद्यापासून कसे दूर राहिलो या संबंधी बोलतो. जर तुमची इच्छा असेल तर तुम्हाला मदत करण्यात आम्हांला आनंद वाटेल.

 
 

तुम्ही कधी, आपण बेहोष होणार नाही, ह्या आशेने मद्याचे प्रकार बदलून पहाण्याचा प्रयत्न केला आहे का?

आम्ही सर्व मार्गांचा अवलंब केला. आम्ही आमचे मद्य सौम्य करून पाहिले. किंवा आम्ही फक्त बियर प्यायलो. किंवा आम्ही फक्त आठवड्याच्या सुट्टीच्या दिवशी प्यायलो. तुम्ही म्हणाल त्या सर्व मार्गाचा आम्ही प्रयत्न केला आहे. परंतु ज्यात अल्कोहोल आहे असे काहीही आम्ही प्यायलो तरी शेवटी आम्ही बेहोष झालोच.

 
 

मागिल काही वर्षे तुम्हाला जाग आल्यावर डोळे उघडण्यासाठी मद्याची आवश्यकता भासली आहे का?

तुम्हाला दिवसाची सुरुवात करण्यासाठी किंवा शरिराचा कंप थांबविण्यासाठी मद्य प्यावे लागते का? तुम्ही समाजसंमत मद्यपान करीत नाहीत ह्याचे हे प्रभावी लक्षण आहे.

 
 

जे लोक कोणत्याही अडचणीत न सापडता मद्यपान करू शकतात त्यांचा तुम्हांला हेवा वाटतो का?

कधी ना कधी आमच्यापैकी बहुतेकांना आश्चर्य वाटत होते की, बहुसंख्य लोक जसे मद्यपान करू शकतात किंवा थांबवू शकतात, त्यांच्या सारखे आम्ही का करू शकत नाही.

 
 

मागील काही वर्षात मद्यपानाशी निगडीत अशा समस्या तुम्हाला निर्माण झाल्या का?”

प्रामाणिकपणे सांगा ! डॉक्टर सांगतात की जर तुम्हाला मद्यापासून त्रास होत असेल आणि जर तुम्ही मद्यपान चालूच ठेवले तर तुमचा त्रास वाढतच जाईल, तो कधीही बरा होणार नाही, शेवटी तुम्ही मृत्यूमुखी पडाल किंवा उर्वरित आयुष्यासाठी एखाद्या उपचार केंद्रात पडून रहाल. मद्यपान थांबविणे हा एकच आशेचा किरण आहे.

 
 

तुमच्या मद्यपानामुळे तुमच्या कुटुंबात काही समस्या निर्माण झाल्या आहेत का?

अे. अे. मधे येण्यापुर्वी आमच्यापैकी बहुतेकजण सांगत होते की, कुटुंबातील व्यक्ती किंवा समस्या ह्यामुळे आम्ही मद्यपान करीत होतो. आमच्या मद्यपानामुळे सर्व समस्या अधिकच गंभीर होत होत्या हे आम्हाला दिसत नव्हते. मद्यपानामुळे केव्हांही किंवा कोणतीही समस्या सुटू शकली नव्हती.

 
 

तुम्ही समारंभात तुम्हाला पुरेसे मद्य मिळाले नाही म्हणून अधीक मद्य मिळविण्याचा प्रयत्न केला आहे का?

आमच्यापैकी बहुतेकजण, समारंभात पुरेसे मद्य मिळणार नाही असे वाटल्यास, तिथे जाण्याचा अगोदर “थोडेसे” मद्यपान करून जात होतो. आणि भराभर मद्य दिले गेले नाही तर आम्ही मद्यपान करण्यासाठी इतरत्र जात होतो.

 
 

जरी तुम्ही तुमची इच्छा नसतांना बेहोष होत होतात तरी, आम्ही पाहिजे तेव्हा मद्यपान थांबवू शकतो असे स्वतःलाच सांगत होतात का?

आम्हाला मद्यपान करावयाची  इच्छा आहे म्हणून आम्ही मद्यपान करतो या विचाराने आमच्यापैकी बहुतेकजण स्वतःलाच फसवत होते. अे.अे. मध्ये आल्यानंतर आम्हास समजले की एकदा मद्यपानास सुरुवात केल्यानंतर आम्ही थांबू शकत नव्हतो.

 
 

मद्यपानामुळे कधी तुमच्या शाळेत किंवा कामाच्या ठिकाणी रजा झाल्या आहेत का?

आमच्यापैकी बहुतेकजण आता मान्य करतात की मद्यपानामुळे डोके चढलेले असणे किंवा बेहोष असणे ही वस्तुस्थिती असताना आम्ही “आजारी” असल्याचा बहाणा केला आहे.

 
 

तुम्ही कधी बेशुध्दावस्थेत गेला आहात का?

“बेशुध्दावस्था” म्हणजे आम्ही काही तास किंवा दिवस मद्यपान करित होतो पण त्याची आठवण राहत नाही अशी अवस्था. अे.अे. मध्ये आल्यानंतर आम्हास समजले की हे अनियंत्रीत मद्यपानाचे लक्षण आहे.

 
 

मद्यपान न केल्यास आपले जीवन चांगले होईल असे तुम्हाला कधी वाटले होते का?

मद्यामुळे आयुष्यात काहीकाळ तरी रंगत आहे, असे वाटल्यामुळेच आमच्यापैकी बहुतेकांनी मद्यपानास सुरुवात केली. अे. अे. मध्ये येईपर्यंत आम्ही पूर्णपणे मद्याच्या विळख्यात सापडलो असल्याची जाणीव झाली. आम्ही जगण्यासाठी मद्यपान करीत होतो आणि मद्यपान करण्यासाठी जगत होतो. कंटाळवाण्या जीवनाला आम्ही कंटाळलो होतो.

 
 

Question 1 of 12